IAF :भारताच्या ऐतिहासिक लढाऊ विमानाची जागा घेणार नविन फायटर जेट, वायुसेना १०० विमानांची देणार ऑर्डर

IAF Tejas :भारतीय हवाई दल (IAF) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून सुमारे 100 अतिरिक्त हलके लढाऊ विमान (LCA) तेजस मार्क-1A लढाऊ विमानांची ऑर्डर देण्यात येणार आहे, अशी माहिती एएनआयकडून मिळाली आहे.

भारतीय वायुसेनेच्या या पाऊलामुळे स्वदेशी एरोस्पेस उद्योगाला चालना मिळणार आहे. मिग-21 लढाऊ विमानांच्या जुन्या ताफ्याला बदलण्यासाठी आणखी 100 तेजस मार्क-1ए लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तेजस मार्क-1A हे स्वदेशी बनावटीचे, विकसित आणि निर्मित आधुनिक 4-प्लस पिढीचे लढाऊ विमान असून 65 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक आहेत.

St Bus Video Viral : हातात छत्री घेऊन चालक चालवतोय बस; अहेरी आगारातील बसचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

स्वदेशी विकसित अ‍ॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेले अ‍ॅरे (AESA) रडार, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) क्षेपणास्त्र, आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) सूट आणि एअर-टू-एअर रिफ्युएलिंग (AAR) क्षमतांसह, तेजस MK1 A ऑपरेशनल करण्यात येईल.

अलीकडेच, IAF प्रमुख VR चौधरी यांनी देखील तेजस मार्क-1A च्या विकास प्रकल्पाचा आढावा घेतला आणि हे विमान आपल्या ताफ्याचे स्वदेशीकरण करण्याच्या दिशेने IAF च्या प्रयत्नांचे ध्वजवाहक असल्याचे समोर आले.

यापूर्वी 2021 मध्ये, IAF ने 73 LCA तेजस मार्क-1A लढाऊ विमाने आणि 10 LCA तेजस मार्क-1 विमानांच्या वितरणासाठी HAL सोबत करार केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply