
‘भारत जोडो’ यात्रेमुळे सध्या चर्चेत असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप त्यांनी केली आहे. राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपा नेते संताप व्यक्त करत असताना सावरकरांच्या कुटुंबीयांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरेंना त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आपण राहुल गांधींविरोधात पोलीस तक्रार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. “क्रांतीकारकांशी राहुल गांधी यांचं काही देणंघेणं नाही. पण चंद्रशेखर आझाद, सावरकर देशद्रोही असल्याचं ट्वीट त्यांनी केलं होतं. याविरोधात मी भोईवाडा कोर्टात दाद मागितली होती. कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला होता. पण आता मी दुसरी तक्रार दाखल करणार आहे,” असं रणजीत सावरकर यांनी सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले की “ब्रिटिशांनीही कधी सावरकरांनी माफी मागितल्याचं म्हटलेलं नाही. पण दुर्दैवाने आपल्या देशात तसं बोललं जात आहे. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता, तेव्हा बाळासाहेबांनी मुंबईत पाय ठेवू देणार नाही असं सांगितलं होतं. शिवतीर्थावरच जोडे मारो आंदोलन झालं होतं. पण दुर्दैवाने आज त्याच शिवसेनेचे वारस वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबरोबर पदयात्रा काढत आहेत. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस नेते स्मृतीस्थळावर येणार असल्याचंही मला कळलं आहे”.
“आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन आहे. अशा पवित्र दिनीही नाना पटोले यांनी पुन्हा असेच आरोप केले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे वारसदार त्यांचं कसं स्वागत करतात हे मला पाहायचं आहे,” असंही ते म्हणाले.
“हिंदुत्ववादी शक्तींकडे सत्ता आली म्हणजेच वाजपेयी सरकार आल्यापासून सावकरांनी माफी मागितली अशा भूमिका घेण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत इतके वर्ष कोणी काही म्हणत नव्हतं. १० वर्ष सरकार नव्हतं तेव्हा आरोप बंद झाले होते. पण २०१४ मध्ये सत्ता गेल्यानंतर पुन्हा आरोप सुरु झाले. त्यामुळे हा फक्त सत्तेचा खेळ आहे. सत्तेच्या खेळात महापुरुषाचा अपमान होत असल्याचं यांच्या लक्षात येत नाही आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी तुमच्या अंगावर पडेल असं प्रत्युत्तर त्यांनी नाना पटोलेंना दिलं आहे. सावकरांना बदनाम केलं तर हिदुत्वाची विचारधारा बंद होईल असं त्यांना वाटत आहे. पण ती हजार वर्षांपासूनची विचारधारा आहे. जोपर्यंत हिंदुत्व असेल तोपर्यंतच भारत सर्व धर्मांना समान न्याय देणारा ठरेल,” असंही त्यांनी सांगितलं.
“काँग्रेसबरोबर जावं लागलं तर माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेब म्हणाले होते. पण आज त्यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेते सावरकरांचा अपमान करतात. त्यांचं शिवसेने कसं स्वागत करते हे जनतेनेही पाहावं. आदित्य ठाकरे यांनी तर राहुल गांधींची गळाभेट घेतली. अशा व्यक्तीचा सहवासही तुम्ही टाळला पाहिजे. तुम्ही त्यांना ठामपणे आम्ही सावकरांचा अपमान सहन करणार नाही असं सांगितलं पाहिजे,” असा सल्ला रणजीत सावरकर यांनी दिला आहे.
एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली, अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात केली.
राहुल गांधी म्हणाले, सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. बिरसा मुंडा यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यावेळी राज्यकर्त्यांनी मुंडा यांना पैसा, जमीन देण्याचा प्रयत्न केला. आमच्या कडून जे हवे ते घ्या, पण विद्रोह करू नका असे इंग्रजांचे म्हणणे होते, पण ते आमिषाला बळी पडले नाहीत. त्यांनी इंग्रज सरकारचा सामना केला. यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. सावरकर यांची विचारधारा देशाला तोडणारी आहे, तीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
शहर
- पुण्यात संशयाचे भूत; पत्नीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, पतीने केली तरुणाची निर्घृण हत्या!
- पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर धावत्या कारमध्ये महिलेला अमानुष मारहाण
- छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारांचा थरारक पैलू; वृद्ध माऊली दीड महिना 'डिजिटल अरेस्ट', ९३ लाख ५० हजारांचा गंडा
- लग्नात 'स्कॉर्पिओ' दिली तरी 'फॉर्च्युनर'साठी छळ! सासरच्या जाचाला कंटाळून दीपिकाने १४ महिन्यांतच संपवलं आयुष्य!
महाराष्ट्र
- खाकीची असंवेदनशीलता! नागपुरात बेपत्ता मुलीच्या पालकांच्या आक्रोशासमोर पोलिसांचे अजब उत्तर; म्हणाले, "शोधायला गाडीत 'डिझेल'च नाही!"
- मुंबईत धावत्या रिक्षावर कोसळले महाकाय झाड! १४ वर्षीय आरिका श्रीवास्तवचा दुर्दैवी मृत्यू, एक जण गंभीर!
- नागपूर: १२ वर्षांचा संसार, पदरात २ लेकरं! पत्नीने मुलांची जबाबदारी नाकारत घर सोडल्याने नागपुरात ३४ वर्षीय पतीची आत्महत्या!
- लातूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना; बोधे नगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू
गुन्हा
- उत्तर प्रदेश हादरले! घरात एकट्या असलेल्या विवाहितेचे हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबून निर्घृण हत्या!
- पुण्यात संशयाचे भूत; पत्नीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, पतीने केली तरुणाची निर्घृण हत्या!
- इंजिनिअर भावंडांची 'बनावट' माया! गडचिरोलीत नकली नोटांची फॅक्टरी उद्ध्वस्त; नागपूर कनेक्शन उघड, ४ जण अटकेत!
- छत्तीसगड हादरले! दारुड्या पतीने केली गर्भवती पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; पोटातील बाळही दगावले!
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
- 'जेलर २' च्या सेटवर काळाचा घाला! २८ वर्षीय कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; रजनीकांतच्या चित्रपटाच्या शुटिंगला गालबोट.
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
देश विदेश
- इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर थरार! लाईव्ह शोमध्ये न्यूज अँकरने थेट युएईच्या झेंड्यावर चालवली गोळी; व्हिडिओ व्हायरल
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.


























Subscribe to my channel




