
सांगली : जतच्या दुष्काळी भागातील गावांना पाणी देण्यासाठी विस्तारित योजनेसाठी जानेवारीपर्यंत निविदा काढण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जाहीर केले असले तरी याच विधानाला जतचे माजी आमदार भाजप नेते विलासराज जगताप यांनी आव्हान दिले असून या पद्धतीची दिशाभूल करणारी वक्तव्ये टाळून प्रत्यक्ष कृती काय करणार हे सांगण्याचा आग्रह धरला आहे.
या निमित्ताने श्रेयवाद रंगला असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाण्याबरोबरच हाताला काम देण्यात हे सरकार प्रयत्नशील राहील याची ग्वाही देत असताना नव्या वर्षांची पहाट आनंददायी असेल असे सांगत सीमावर्ती भागातील दुखण्यावर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आहे. जतमधील ४० गावांवर कर्नाटकने दावा सांगत असतानाच हा दावा अधिक सक्षम करण्यासाठी तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी जत पूर्व भागातील गावांना नैसर्गिक प्रवाहाने आले आहे. या पाण्याने रात्रीच्या केवळ बारा तासांत पूर्व भागातील महत्त्वाचा समजला जात असलेला तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहू लागला आहे. पाण्याच्या निमित्ताने सीमाभागात राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे असलेल्या असंतोषाला खतपाणी घालण्याचा खोडसाळपणा कर्नाटक करत असताना राज्यात मात्र राजकीय कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. गेली ४० वर्षे जतकरांना म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे गाजर दाखवून निवडणुका लढविल्या गेल्या.
विस्तारित म्हैसाळ योजनेला अद्याप तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता नसताना जानेवारीमध्ये निविदा काढून येत्या दीड वर्षांत योजना मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. या योजनेसाठी १९५० कोटींचा निधी लागणार आहे. जतच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या मूळच्या योजनाही दोन-तीनशे कोटींसाठी अडली आहे. असे असताना नव्याने दोन हजार कोटींचा निधी कसा उपलब्ध होणार याबाबत भाजपच्या नेत्यांच्या मनातच साशंकता आहे.
या सर्व तांत्रिक बाबी असल्या तरी जतचा पाणीप्रश्न सुटावा असे खऱ्या अर्थाने वाटत असते तर शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये बोलावण्यात आलेल्या बैठकीला जतमधील सर्वपक्षीय नेत्यांना का आमंत्रित करण्यात आले नाही, असा रास्त सवाल उपस्थित केला जात आहे. याचबरोबर पाणी संघर्ष समितीलाही या बैठकीला बोलावण्यात आले नाही. नेमका प्रश्न काय आहे, त्यावर दीर्घकालीन व तात्कालिक उपाय काय असू शकतो याचा सारासारविचार न होता, केवळ दिशाभूल करणारी आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याची वृत्ती निश्चितच भविष्याच्या दृष्टीने आत्मघातकी ठरू शकेल, अशी साधार भीती सीमावर्ती भागाला आहे.
राजकीय गणिते या बैठकीला केवळ पालकमंत्री, खासदार उपस्थित होते. जगताप हे भाजपमधील बडे प्रस्थ असले तरी त्यांनाही पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत असावा. जगताप यांचे वक्तव्य विद्यमान काँग्रेस आमदाराबरोबरच खासदार यांच्या विरोधातील संघर्षांतही दडलेले असू शकते. मात्र त्यांनी या वक्तव्याबाबत आमदारांना धारेवर न धरता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिशाभूल टाळावी असे सांगत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यात फार मोठे सख्य अद्याप निर्माण झाले नसल्याचे अधोरेखित केले आहे. आ. शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघालगतच जत तालुका असल्याने त्याचेही धागेदोरे जतमध्ये दिसले तर नवल नाही.
मुंबईमध्ये जतच्या पाणीप्रश्नावर झालेल्या बैठकीस जलसंपदा, अर्थ या विभागाचे सचिवच उपस्थित नसताना विस्तारित योजनेबाबत मुख्यमंत्री धोरणात्मक निर्णय कसे जाहीर करू शकतात. या बैठकीस पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. त्यांनी दोनशे कोटींचा दिलेला निधी हा जलजीवन मिशन योजनेसाठी असून ही बैठक पाणीपुरवठय़ाचीच होती. तरीही म्हैसाळ विस्तारित योजनेबाबत चर्चा होउन जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.
– विलासराव जगताप, माजी आमदार
जतचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बैठकीला आमंत्रण नाही हाच मुळात माजी आमदार विलासराव जगताप यांचे दुखणे आहे. गेली चाळीस वर्षे राजकारणात असूनही त्यांनी वंचित गावासाठी नेमके काय केले याचे उत्तर देण्यासाठी त्यांचे कर्तव्य उणे पडत असल्यानेच त्यांनी आता श्रेयवादासाठी वाद उकरून काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.
– विक्रमसिंह सावंत, काँग्रेस आमदार
जत पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या ४२ गावांतील लोकांची नव्या वर्षांतील पहाट आनंददायी ठरविण्याचे शिंदे-फडणवीस सरकार निश्चितपणे करेल. मात्र केवळ पाणी देणे म्हणजेच विकास नव्हे तर येथील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहत विकसित करून उद्योग आणण्याचे प्रयत्नही केले जातील.
-उदय सामंत, उद्योगमंत्री
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


