श्रीरामपुरात लॉजमध्ये आढळला मृतदेह

श्रीरामपूर : शहरातील सुर्या लॉजमध्ये उमर मेहबूब शेख (वय ५०).या व्यक्तीचा फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आज (ता. २३) आढळून आला.याबाबत लॉज मालक युवराज विजय शिंदे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यात म्हटले आहे की, बोरिवली (ईस्ट), मुंबई येथील अंबिका फास्ट फूड येथे राहणारे उमर शेख यांनी १९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता लॉजमध्ये खोली भाड्याने घेतली होती. दि २२ रोजी सकाळी ९ वाजता कर्मचारी चहा नाश्ता पाहिजे का चौकशी करण्यासाठी गेले असता आतून दार बंद होते. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही शिवाय काहीतरी कुजल्यासारखा घाण वास येत होता. दरवाजा उघडला असता सदर व्यक्ती पलंगावर मृत अवस्थेत आढळून आला.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पाटील यांचेकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी प्राथमिक तपासात सदर व्यक्तीची मुंबई पोलिसांकडून माहिती घेतली असता तो मुंबईत हॉटेलमध्ये कामाला होता. येथील काम सोडल्यानंतर त्याला कोणी नातेवाईक नसल्याने तो जालना येथील भिक्षागृहात वास्तव्यास असल्याची माहिती त्यांनी दिली. मृतदेहाच्या पहाणीवेळी औरंगाबाद येथील एका रुग्णालयात हृदयाच्या आजाराबाबत उपचार घेत असल्याची फाईल खोलीत सापडली. याबाबत भिक्षागृहाच्या यंत्रणेशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस नाईक अहिरे करीत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *