
पुणे : राज्यात ओला दुष्काळ आणि पूर परिस्थितीचे संकट ओढवले आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह सर्वत्रच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, संकटाच्या काळात राज्यातील सरकारचे अस्तित्वच कोठे दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केली. एका कार्यक्रमासाठी मुंडे पुण्यात आले असता, माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.
मुंडे म्हणाले,‘अतिपावसामुळे ऊस पीक वगळता शेतकऱ्यांच्या हाती कोणतेही पीक लागलेले नाही. शिंदे-फडणवीस सरकारने मंत्री मंडळाचा विस्तार उशिरा केला. पालकमंत्र्यांची घोषणा उशिरा केली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कोणतीही पीक विमा कंपनी शेतकऱ्याला दिलासा द्यायला तयार नाही. ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या ठिकाणी अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा.’
गेल्या वर्षी अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्या वेळी महाविकास आघाडीचे सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान दिले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सोयाबीन पिकासाठी पीक विम्याची रक्कम आगाऊ देण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारने ही भूमिका घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून जमणार नाही. आज शेतकरी उद्विग्न झाला असून राज्य सरकारने त्यांची परीक्षा पाहू नये, असे आवाहन मुंडे यांनी केले.
या सरकारमधील मंत्री राज्यात कोठेच फिरताना दिसत नाहीत. सध्याच्या संकटाच्या काळात या सरकारचे अस्तित्व राज्यात कोठेच दिसत नाही. विरोधी पक्ष आवाज उठवत आहे, पण सरकारने मदत करायचीच नाही, असे ठरवले आहे. हे सरकार जनतेच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या स्वार्थासाठी अस्तित्वात आले आहे. त्यामुळे त्यांना स्वार्थाव्यतिरिक्त काहीच दिसत नाही, असा आरोप करून धनंजय मुंडे म्हणाले,की दिवाळीसाठी शंभर रुपयात शिधा देण्याची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठी आहे. कोणालाही दिवाळीपूर्वी शंभर रुपयांत शिधा मिळालेला नाही.
भारतीय जनता पक्ष सबंध देशात प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपविण्याचा प्रयत्न अनेकदा केला, मात्र त्यांनी दहा वेळा जन्म घेतला तरीही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस फोडता येणार नाही, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




