आजच्या भू-राजकारणात जो खेळ सुरू आहे, त्याला ताकद वाढवण्याचा आणि वेळ साध्य करण्याचा खेळ म्हणता येईल. ही केवळ एकाविरुद्ध दुसऱ्याची स्पर्धा नाही.यात एकाची ताकद वाढली की दुसऱ्याची कमी होते असे नाही, तर उलट एकाची ताकद वाढली की दुसरा त्यापेक्षाही जास्त ताकद वाढवतो. तुमच्याकडे जेवढी शक्ती आणि फायदा उठवण्याची क्षमता असेल, तेवढाच वेळ तुमच्या हातात असतो. आता भारत या समीकरणात कुठे आहे, हे पुढे समजेलच. जरा लेसोथो या देशाबद्दल विचार करा. केवळ २३ लाख लोकसंख्या असलेला हा डोंगराळ देश चहूबाजूंनी दक्षिण आफ्रिकेने वेढलेला आहे. गरिबीशी झुंजणाऱ्या या देशात एड्सग्रस्तांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि तिथले दरडोई उत्पन्न पाकिस्तानच्या तुलनेत निम्मे आहे. पण त्यांच्याकडे एक विशेष औद्योगिक ताकद आहे. या देशाला जगाचे ‘जीन्स केंद्र’ म्हटले जाते. येथील गारमेंट उद्योग ५०,००० लोकांना रोजगार देतो आणि सर्वाधिक निर्यात अमेरिकेला करतो. त्यांच्या निर्यातीचे मूल्य त्यांच्या जीडीपीच्या १०% इतके आहे. ही ताकद त्यांना ‘आफ्रिकन ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी ॲक्ट’ (एजीओए) अंतर्गत अमेरिकेत विनाशुल्क व्यापार करण्याच्या सुविधेमुळे मिळाली होती, पण २०२५ मध्ये ट्रम्प आले, तेव्हा हा कायदा हटवण्यात आला. उलट लेसोथोवर ५०% चा ‘लिबरेशन डे’ टॅरिफ (शुल्क) लादण्यात आला, ज्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली. नंतर हे शुल्क १५% पर्यंत कमी केले असले,तरी आता लेसोथो भारत, बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या उत्पादकांशी स्पर्धा करू शकत नाही.त्यांनी आता ‘आपत्ती काळ’ घोषित केला आहे. लेसोथो हे अशा देशांचे उदाहरण आहे ज्यांच्याकडे ना ताकद आहे ना वेळ. त्यांची अर्थव्यवस्था ट्रम्प पायउतार होण्याची तीन वर्षे वाट पाहू शकत नाही. याउलट चीनकडे सर्वाधिक ताकद आणि वेळ आहे. व्यापारात चीन विक्रेता (अत्यंत आवश्यक खनिजे आणि चुंबक) आणि खरेदीदार (सोयाबीन, मका) अशा दोन्ही रूपांत मजबूत आहे. लष्करी ताकदीत ते अमेरिकेच्या बरोबरीला पोहोचत आहे. अमेरिकेचे लक्ष इतरत्र असताना आणि रणनीतिक दबाव कमी असताना, चीन आपली ताकद एवढी वाढवू शकतो की, ट्रम्प यांच्यानंतर येणारा कोणताही नेता त्यांची बरोबरी करू शकणार नाही. जर या मोजमापात लेसोथो सर्वात खाली आणि चीनसर्वात वर असेल, तर बाकी देशांचे काय? युरोपचे संकट आणि लेसोथोचे संकट यांची तुलना करणे कदाचित विचित्र वाटेल, पण तसे नाही. युरोपला याची जाणीव म्युनिख सुरक्षा परिषदेत झाली, जेव्हा त्यांना समजले की त्यांची ताकद कमी आहे आणि ते सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून आहेत. आता ते संरक्षणावरील खर्च वाढवतील, पण स्वतःला सुरक्षित वाटण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागतील. लढाऊ विमाने, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे आणि १५५-मिमी तोफा तुम्ही सहज ऑर्डर करून मागवू शकत नाही. शिवाय लढण्यासाठी नागरिकही तयार करावे लागतात. जेव्हा पुतीन तुमच्या दारात उभे असतात, तेव्हा तुमच्याकडे वेळ उरत नाही. चीनच्या तुलनेत अमेरिकेची ताकद आजही जास्त आहे, पण त्यांच्याकडे वेळ फक्त ट्रम्प यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळापर्यंत आहे. अमेरिका ही जगातील निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ आहे आणि त्यांच्याकडे टॅरिफची शक्ती आहे. त्यांचे सैन्य सर्वात प्रबळ आहे आणि मित्रराष्ट्र ८० वर्षांपासून त्यांच्या सोबत आहेत. युरोप, ब्रिटन, जपान,दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि तैवान त्यांच्यावर अवलंबून आहेत. भारतासारख्या मित्रदेशांनाही चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेची गरज आहे. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या, एआयमधील आघाडी आणि जगाचे राखीव चलन असलेला डॉलर अमेरिकेकडे आहे,पण ट्रम्प यात गुंतवणूक करण्याऐवजी ही ताकद खर्च करत आहेत. यामुळे अमेरिकेची शक्ती घटत आहे आणि वेळ हाताबाहेर जात आहे. तीन वर्षांनंतर अमेरिका कदाचित एक वेगळीच महासत्ता असेल. तेव्हा ते चीनच्या मागेपडतील का? मित्रराष्ट्र त्यांच्यावर विश्वास ठेवतील का?‘ग्रीनलँड’ हे नाव लक्षात ठेवा. भविष्यात असाच एखादा अनपेक्षित नेता आला तर काय होईल, याची चिंता मित्रराष्ट्रांना असेलच. तसे पाहता अमेरिकेकडे वेळ फक्त तीन वर्षांचाच नाही,तर पुढच्या निवडणुकीपर्यंत किंवा फक्त १० महिन्यांचाही असू शकतो, जर मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प कमकुवत झाले तर हे एक महत्त्वाचे तथ्य दर्शवते—लोकशाही देशांकडे वेळेची मर्यादा असते. पुढच्या १ ते ५ वर्षांत या सर्वदेशांत निवडणुका होतील. इस्रायलकडे सध्या आघाडी आहे. आशिया आणि आफ्रिकेच्या सीमेवर असलेली ही एक पाश्चात्य लोकशाही असून अमेरिका, युरोप आणि भारताचा महत्त्वाचा मित्र आहे, पण निवडणूक किंवा न्यायालयाच्या निर्णयामुळे नेतन्याहू यांना पायउतार व्हावे लागू शकते. त्यांच्यानंतर एक वेगळाच इस्रायलसमोर येऊ शकतो. वेळेची मर्यादा हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे, पण हे जिनपिंग, पुतीन किंवा मुनीर यांना लागू होत नाही. उत्तर कोरियासारखी हुकूमशाही असो किंवा पाकिस्तानसारखी मिश्र हुकूमशाही, तिथे वेळेचे बंधन नसते. मात्र, अशा देशांत अचानक मोठे बदल घडू शकतात. आता प्रत्येक देश हा खेळ शिकत आहे. काही देशनवीन मित्र शोधत आहेत, तर काही पूर्वी दुर्लक्षित असलेल्या देशांना महत्त्व देत आहेत. भारत आणि युरोप हे याचे मोठे उदाहरण आहेत. या बदलत्या जगाने भारताला अधिक खुल्या आणि स्पर्धात्मक बाजारपेठेचे फायदे पाहण्यास भाग पाडले आहे. रशिया, इराण,तुर्की, सौदी अरेबिया आणि यूएई सारखे देशही स्वतःलाया स्पर्धेसाठी तयार करत आहेत. ताकद आणि वेळेच्या मोजमापात आपण कुठे आहोत? आपली ताकद सध्या मर्यादित आहे, ज्याचा प्रत्यय ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आला, जेव्हा आपले ३२ धोरणात्मक भागीदार असूनही फार कमी जण पाठीशी उभे राहिले. भारताची ताकद वाढवण्याचा मार्ग म्हणजे जीडीपी वाढवणे,आर्थिक सुधारणा करणे आणि बाजारपेठ खुली करणे हाच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आम्ही रणनीती बदलली;
करारांची तयारी दर्शवली
ट्रम्प यांचा कार्यकाळ आपल्या संयमाची आणि निर्णयक्षमतेची परीक्षा घेणारा असेल.भारताने आपली रणनीती बदलली आहे,व्यापार करार केले आहेत, आर्थिक सुधारणा केल्या आहेत आणि संरक्षण बजेटमध्ये वाढ केली आहे. दीर्घकाळापासून रखडलेली खरेदीही सुरू झाली आहे. यालाच ताकद वाढवणे आणि वेळ मिळवणे असे म्हणतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


