शिमला : पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये हाहाकार! ९० वर्षे जुना पूल गेला वाहून,

शिमला: हिमाचल प्रदेशसह उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हिमाचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. हिमाचलमधील कांगडा जिल्ह्यात चक्की पूल वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर चक्की नदीवर बांधलेला ९० वर्षे जुना रेल्वे पूल ८०० मीटर लांब आहे. चक्की नदीला आलेल्या पुरामुळे पुलाचे खांब वाहून गेले आहेत. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा पूल वाहून जात असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे

हा पूर वाहून गेल्यानंतर पठाणकोठ ते जोगिंदरनगर दरम्यानची नॅरोगेज ट्रेन सेवा पुलाचा नवीन पिलर तयार होईपर्यंत बंद राहणार आहे. १९२८ मध्ये ब्रिटिशांनी हा नॅरोगेज रेल्वे मार्ग सुरू केला. या पूलावरुन दररोज ७ गाड्या धावत होत्या.

हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असून येथील सर्व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.

केम्पटी पोलीस ठाण्यानेही धबधब्याच्या आजूबाजूच्या दुकानदारांना आणि पर्यटकांना सुरक्षेसाठी हटवले आहे. पोलिसांनी धबधब्याकडे पर्यटकांचा प्रवेश बंद केला आहे. आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर केम्प्टी फॉल्स धबधब्याला जोर आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply