कर्नाटक : १० वर्षांच्या मुलाला शिक्षकाकडून मारहाण; पहिल्या मजल्यावरुन खाली फेकलं

कर्नाटकात एका १० वर्षीय मुलाला त्याच्या शिक्षकाने मारहाण केली आणि पहिल्या मजल्यावरुन खाली फेकलं. यामुळे या विद्यार्थ्याच्या मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी चौथीत शिकत होता.

हगळी गावातल्या आदर्श प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुथाप्पा या शिक्षकाने भरत या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, या मारहाणीला घरगुती वादाची पार्श्वभूमी आहे. मुथप्पाने भरतची आई गीता यांनाही मारहाण केली आहे.

गीता याच शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुथाप्पा या शाळेत कंत्राटी पद्धतीने काम करत आहे, तो सध्या फरार आहे. दिल्लीतही काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. रागाच्या भरात एका शिक्षकाने पाचवीतल्या विद्यार्थिनीवर कात्रीने वार केले होते आणि तिला शाळेच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं होतं.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *