वाळू धोरणात लवकरच बदल; बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई : महसूल विभागाकडे अवैध वाळूचोरीचा मोठा प्रश्न असून याबाबत काळजी घेण्यात येत आहे. वाळू धोरण राबवताना त्यात सहजता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे वाळू धोरणात लवकरच बदल करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात असलेल्या मौजे बारव्हा परिसरातील अवैध रेती चोरी संदर्भात डॉ. परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मौजे बारव्हा या परिसरात होत असलेल्या अवैध रेती चोरी संदर्भात स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप करत फुके यांनी यावेळी लाखांदूर येथे होत असलेल्या वाळू चोरीचा व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. त्याबाबत योग्य ती चौकशी करावी, असे निर्देशही सभापतींनी महसूलमंत्र्यांना दिले. त्यावर थोरात म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरातील अवैध रेतीची ८ प्रकरणे निदर्शनास आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी सापडलेला साठा तसेच यंत्रे जप्त करण्यात आली. त्यामुळे राज्यातील एकूण वाळू धोरणाच्या संदर्भात सहजता निर्माण होईल, यासाठी लवकरच बदल केले जाणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply