रायगड : सहलीला गेलेले औरंगाबादचे विद्यार्थी रायगडच्या समुद्रात बुडाले; चौघांना वाचवण्यात यश

रायगडः औरंगाबाद जिल्ह्यातल्या शालेय विद्यार्थ्यांची सहल रायगड येथे गेली होती. सोबत शिक्षकही होते. यावेळी सहा विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी सुदैवाने चार विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे.

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी विद्यालयाची सहल रायगडच्या काशीद बीचवर गेली होती. ७० विद्यार्थ्यांसोबत पाच शिक्षकही होते. मुरुड जंजिरा येथील काशीद समुद्रामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सहा विद्यार्थी खोल समुद्रात गेले होते. त्यापैकी चार विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं तर एकाचा बुडून मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

बुडालेल्या विद्यार्थ्यांवर अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मृत विद्यार्थ्याचं नाव प्रणव कदम असं सांगितलं जात आहे. तर रोहन बेडवाल हा बेपत्ता असून सायली राठोड, कृष्णा पाटील, तुषार वाघ, रोहन महाजन यांची प्रकृती स्थिर आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी विद्यालयाची सहल रायगड जिल्ह्यामध्ये गेली होती. समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply