राजदीप सरदेसाईंचा यांचा कॉलम:आसामच्या राजकारणात चाललेय तरी काय?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎सोशल मीडियाच्या आधीच शंकास्पद नैतिक मानके‎असूनही आसाम भाजपने शेअर केलेला व्हिडिओ एका‎नवीन नीचांकावर पोहोचला. या वादग्रस्त व्हिडिओमध्ये‎(तो आता काढून टाकण्यात आला आहे) आसामचे‎मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना अगदी जवळून एअर‎रायफलमधून गोळीबार करताना दाखवले होते. त्यांच्या‎निशाण्यावर दोन व्यक्ती होते - एक टोपी घातलेला व‎दुसरा दाढी असलेला. व्हिडिओमध्ये बांगलादेशी‎घुसखोरांविरुद्ध व आसामी अस्मिता जपण्याच्या बाजूने‎निषेध असल्याचा दावा केला गेला होता. खरे तर‎व्हिडिओने मांडलेली हिंसक, सांप्रदायिक प्रतिमा स्पष्टपणे‎द्वेषपूर्ण होती. एका राज्याचा मुख्यमंत्री - राज्यघटनेने‎निवडून आलेले नेते - यांनी उघडपणे एखाद्या समुदायावर‎बंदूक रोखणे हे घटनात्मक अधिकारांचे गंभीर उल्लंघन‎आहे.‎ नंतर सरमा यांनी असा दावा केला की त्यांना अशा‎कोणत्याही व्हिडिओची माहिती नव्हती. परंतु असे‎स्पष्टीकरण अप्रासंगिक आहे. कारण हा व्हिडिओ आसाम‎भाजपच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला होता.‎तो काढून टाकण्यापूर्वी दहा लाखांहून अधिक वेळा‎पाहिला गेला होता. शिवाय ही एक वेगळी घटना नव्हती.‎गेल्या काही महिन्यांपासून सरमा "मियां" या शब्दाचा वापर‎करून विषारी मोहीम राबवत आहेत. तो आसाममधील‎बंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणारा‎अपमानजनक शब्द आहे. सरमा यांनी "मियां’ वर आर्थिक‎बहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले आहे. मग ते‎दुकानदार, भाजीपाला विक्रेते किंवा ऑटो-रिक्षाचालक ‎‎असोत. त्यांच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करण्याऐवजी‎सरमा यांनी त्यांच्या विधानांचे वर्णन आसामच्या‎सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या ओळखीचे रक्षण‎करण्यासाठी "आवश्यक’ असे केले आहे. स्पष्टपणे‎सरमा अशा विधानांमध्ये निवडणूक क्षमता पाहतात.‎आज सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर व्यापक भ्रष्टाचाराचे ‎‎आरोप होत आहेत. तेव्हा जातीय भाषणबाजी केवळ ‎‎महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत नाही तर ‎‎समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे साधन बनते. //"बाहेरील’ ‎‎लोकांविरुद्धचा राग हा आसामच्या गुंतागुंतीच्या वांशिक ‎‎परिदृश्याचा एक भाग आहे. राज्याची अंदाजे 38 टक्के ‎‎मुस्लिम लोकसंख्या असूनही यामुळे लोकसंख्याशास्त्रीय ‎‎बदल आणि सांस्कृतिक ऱ्हासाची भीती निर्माण करणे‎सोपे होते. म्हणूनच आसामबाहेर ही बाब द्वेषपूर्ण भाषण‎मानले जाईल. स्थानिक लोकसंख्येच्या ऐतिहासिक,‎भाषिक, सांस्कृतिक आणि आर्थिक हक्कांचे रक्षण‎म्हणून ते भलेही राज्यात सादर केले जात आहे. भाजप‎नेतृत्व देखील या आक्षेपार्ह व्हिडिओवर मौन बाळगत‎आहे. "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा ‎‎नारा असूनही निवडणुकीपूर्वी आसाममध्ये जातीय‎वातावरण चिघळवून ठेवण्यात राजकीय फायदा दिसून‎येतो. भाजप नेते "घुसखोरांच्या’ कथित धोक्याचाही‎वारंवार उल्लेख करतात. वास्तविक आंतरराष्ट्रीय‎सीमांवर लक्ष ठेवणे ही केंद्रीय दलांची जबाबदारी आहे.‎सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे बहुसंख्य राजकारणाच्या‎विजयी मोर्चासमोर स्वयंघोषित "धर्मनिरपेक्ष’ वर्ग देखील‎जवळपास शक्तीहीन आणि असहाय्य दिसतो. वरील‎व्हिडिओसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची‎मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी सर्वोच्च‎न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. परंतु‎व्यापक राजकीय वर्गाने शर्मा यांच्या जातीयवादाचा थेट‎सामना करण्यास संकोच दाखवला. कारण यामुळे हिंदू‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मतदार आणखी दुरावू शकतात अशी भीती आहे. एक‎काळ असा होता जेव्हा काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिम‎तुष्टीकरणाचा आरोप केला जात होता; आज बहुसंख्य‎हिंदू मतांसाठी स्पर्धा आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी शर्मा‎यांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये पोलिस तक्रार दाखल केली‎असेल तर ते हिंदू मतांवर अवलंबून नसल्यामुळे आहे.‎आणि कदाचित म्हणूनच शर्मा इतक्या मुक्तपणे द्वेषपूर्ण‎भाषण करू शकतात. काँग्रेसचा दीर्घकाळचा नेता‎भाजपचा पोस्टर बॉय बनणे हे समकालीन राजकारणातील‎संधीसाधू पक्षांतराचे एक दुर्मिळ उदाहरण आहे. 2015 ‎मध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दावा केला की‎त्यांनी काँग्रेस सोडली. कारण राहुल गांधींनी एका खाजगी‎बैठकीत त्यांचा //"अपमान’ केला होता. राहुल गांधींना‎आसामच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या पाळीव‎कुत्र्याला बिस्किटे खायला घालणे हे जास्त महत्त्वाचे‎वाटले. सत्य हे आहे की त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा‎काँग्रेसमध्ये पूर्ण झाल्या नाहीत. तेव्हा भाजप त्यांच्यासाठी‎एक सुरक्षित व अनुकूल पर्याय बनला. भाजपने शर्मा‎यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते या सत्याचा विसर‎पडला. मात्र पक्षांतरानंतर त्यांच्यावरील सर्व खटले मागे‎घेण्यात आले आहेत किंवा त्यांची गती मंदावली आहे.‎आज 57 वर्षीय शर्मा हे भाजपच्या नवीन पिढीतील‎आघाडीचे नेते आहेत. ही पिढी अटलबिहारी‎वाजपेयी-अडवाणी काळातील भाजप नेते राजकीय‎शुद्धता, नैतिक संयम किंवा घटनात्मक मूल्यांना बांधील‎होते. ही पिढी मात्र अशा साधनशुचितेला बांधील दिसत‎नाही. ही पिढी सर्वात जास्त राजकीय सत्ता मिळविण्याच्या‎तीव्र इच्छेने प्रेरित आहे. म्हणूनच ईशान्येकडील पक्षाचा‎प्रमुख चेहरा एक कुशल निवडणूक व्यवस्थापक आणि‎समस्यानिवारक म्हणून शर्मा यांना एक अमूल्य ‘असेट’‎मानले जाते. परंतु राजकारणाकडून चांगल्याची अपेक्षा‎करणारे नागरिक निःसंशयपणे शर्मा यांच्या वृत्तीमुळे‎अस्वस्थ होतील.‎ पुनश्च : हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडण्याचा‎निर्णय जाहीर केला. तेव्हा एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने पक्ष‎नेतृत्वाला कथितरित्या इशारा दिला होता की "ते भविष्याचे‎नेते आहेत; आम्हाला त्यांच्यासारख्या नेत्याची उणीव‎भासेल.’ एक दशकानंतर तो "भविष्याचा चेहरा’ त्यांना‎एका अंधकारमय वर्तमानाचा भाग वाटत असेल का?‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ काँग्रेससारख्या पक्षांवर मुस्लिम‎तुष्टीकरणाचा आरोप केला जात होता.‎असाही एक काळ होता; परंतु आज‎भारतीय राजकारणात बहुसंख्यांक हिंदू‎मतांसाठी स्पर्धा दिसून येते. कदाचित‎यामुळेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता‎बिस्वा सरमा इतके बेधडकपणे वादग्रस्त‎विधाने करू शकतात हे स्पष्ट होते.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *