मुंबई : शिवसेनेला पुन्हा हादरा? शिंदे-फडणवीस दिल्लीत असतानाच शिवसेना खासदारांचीही बैठक

मुंबई: शिवसेनेतील आमदारांचे बंड आता खासदारपर्यंत पोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेच्या काही खासदारांची काल दिल्लीत बैठक झाल्याचे बोलले जात आहे. कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांना वगळून ही बैठक झाली आहे.

काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला तीन खासदारांनी दांडी मारली होती. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेचे तब्बल ११ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने केला आहे, त्यामुळे दिल्लीतील आजच्या बैठकीने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक काही दिवसांनी होणार आहे. याअगोरच शिवसेनेतील खासदार शिंदे गटात सामील होतील असं बोलले जात आहे. या बैठकीला भाजपचे एक मोठे नेते उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक झाली झाली. ईडीकडून चौकशी सुरू असल्याने संजय राऊत या बैठकीला उपस्थित नव्हते. याशिवाय, भावनी गवळी, श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे हे तीन खासदार बैठकीस अनुपस्थित होते. खासदार गवळी यांनी भाजपशी जुळवून घ्यावे, असे यापूर्वीच सांगितले होते. त्यांनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठकीत अनेक खासदारांनी भाजपशी जुळवून घेण्याचे तसेच, शिवसेना-भाजप युतीचा विचार करावी, अशी विनंती केली. त्यामुळे आता शिवसेनेचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply