मुंबई: राणा दाम्पत्याची मुख्यमंत्री ठाकरे, राऊत, परब यांच्याविरोधात तक्रार

 

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह पाचशे-सहाशे शिवसैनिकांविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आमच्या जीवाचं काही बरं-वाईट झालं तर, त्याला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि परब जबाबदार असतील, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

मुंबईतील खार पोलिसांनी आज, शनिवारी संध्याकाळी नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांना त्यांच्या खार येथील घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर, त्यांना अटक केली. अटकेच्या कारवाईनंतर राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राज्याचे मंत्री अनिल परब यांच्यासह पाचशे ते सहाशे शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली. 'आम्ही मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार अशी घोषणा केल्यानंतर काल संध्याकाळी मातोश्रीवर मीटिंग झाली. त्यानुसार आजची रणनीती ठरली. आज शेकडो लोकांचा जमाव आमच्या घराबाहेर आला. त्यांच्या हातात बॅट, हॉकी आणि इतर शस्त्रसदृश्य वस्तू दिल्या होत्या. आम्हाला जीवे मारहाण करण्यात येईल, असे वातावरण तयार करण्यात आले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply