मुंबई: राणा दाम्पत्याची ‘ईडी’ने चौकशी का केली नाही; संजय राऊतांचा सवाल

मुंबई: खासदार नवनीत राणा आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांचा डी गँगशी संबंधित असलेला लकडावाला सोबत आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे. राणा यांच्या या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस का बोलले नाहीत, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

लकडावाला याच्याकडून राणा दाम्पत्याने ८० लाख रुपये घेतले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा हा मुद्दा आहे,त्यामुळे याचा तपास केंद्रीय यंत्रणांनी केला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

लकडावाला याने जर मनी लॉड्रिंग केलं आहेत तर त्यातील एक राणा दांम्पत्य आहे, याचा तपास अगोदर मुंबईच्या ईओडब्लू ने का केला नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली. मग आता राणा दाम्पत्यावर ईडीने का चौकशी केली नाही. त्यांना पाठिंबा देणारे कोण आहेत. ईडी २०, २५ लाखांसाठी आमच्यावर कारवाई करता मग नवनीत राणा यातूक का सुटले, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

राणा दाम्पत्यांच्या या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत. भाजपच्या (BJP) नेत्यांनीच चौकशी करण्याची मागणी केली पाहिजे. फडणवीस म्हणतात राणा दाम्पत्यांना पोलिसांनी चुकीची वागणूक दिली. राणा दाम्पत्यांचा पोलीस आयुक्तांनी व्हिडिओ ट्विट करुन सत्य समोर आणलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply