मुंबई: राज्य सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार? उद्याच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याची शक्यता

मुंबई: कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. आपण कोरोना महामारी विरोधातील लढाई लढत राहणार असल्याचं मोदी  म्हणाले. तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन महाराष्ट्र तसंच पश्चिम-बंगाल या राज्यांना पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करता येईल का या संदर्भात उद्याच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

उद्या मंत्री मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या विषयी चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. डिझेल चे दर १ रुपयांनी कमी करता येतील का हेही तपासलं जाईल. नरेंद्र मोदींनी टीका केल्यांनातर पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सरकार दर कमी करण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची कोरोना परिस्थीबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरवाढीवरुन महाराष्ट्र तसंच पश्चिम-बंगाल या राज्यांना कर कमी करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली. यावरुन आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे.

पेट्रोल व डिझेल वरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला, मात्र महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply