मुंबई : रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ; फोन टॅपिंग प्रकरणाची नव्याने चौकशी होणार!

मुंबई : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. इतकंच नाही तर, पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करताना न्यायालयात जमा केलेली कागदपपत्रे पुन्हा तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

फोन टँपिंग प्रकरणाची नव्याने चौकशी होणार असल्याने रश्मी शुक्ला यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे या प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावल्याचं म्हटलं आहे. मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान फोन टॅपिंग करण्यात आले होते. राज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडली होती.

या प्रकरणी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. त्यांनीच मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचे दोषारोप ठेवत त्यांची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात येत होती.

मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रश्मी शुक्लांवर झालेले आरोप मागे घेण्यात आले होते. यामुळे त्यांना या प्रकरणी दिलासा मिळाला असे बोलले जात होते. मात्र, आता पुणे सत्र न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply