मुंबई : नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात, दाेन महिला ठार, आठ जखमी

मुंबई : नगर कल्याण महामार्गावर रात्रीच्या सुमारास पेमदरा येथे मजुर महिलांना घेऊन जाणाऱ्या एका गाडीचा अपघात झाला. यामध्ये दोन महिला मजूर ठार झाल्या. तसेच७ ते ८ महिला मजूर जखमी झाल्या आहेत.

मागच्या अनेक दिवसांपासुन नगर कल्याण महामार्ग अपघातांचा सापळा बनला आहे. शेतीच्या कामावरुन मजुर महिला गाडीतुन गर्दी करुन घरी जात असताना समोरुन येणा-या तीन चाकी वाहनाची आणि महिलांच्या गाडीची जोरदार धडक झाली. 

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला. हिराबाई बेलकर, सविता शिंदे असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणी आळेफाटा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *