
मुंबई : दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून जोरदार मोर्चेबंधणी सुरू असून शिवसेना – शिंदे गटातील तणावाचे वातावरण, प्रभादेवीमध्ये उभय गटांमध्ये झालेला वाद या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी नेमकी कोणाला परवानगी द्यायची असा पेच मुंबई महानगरपालिकेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाने याबाबत विधी खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. मात्र एकूण परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता यंदा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी कोणालाच परवानगी मिळणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, यंदा दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदान सुनेसुने राहण्याची चिन्हे आहेत.
गेली अनेक वर्षे शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी ठिकठिकाणांहून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर येत होते. काही महिन्यांपूर्वी शिवसनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर सातत्याने शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर केला आहे. मात्र शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनीही याच कारणासाठी अर्ज करून शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. यावरून उभयतांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन जी-उत्तर विभाग कार्यालयाने या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. अद्याप विधी खात्याने आपला अभिप्राय कळवलेला नाही.
जागतिक अभियंता दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांसाठी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये गुरुवारी रात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदे, शेवाळे आणि चहल यांच्या भेटीनंतर शिवाजी पार्कच्या आरक्षणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला द्यायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच प्रभादेवी परिसरात बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेचे महेश सावंत यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. एकूण परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, शिवसेना अथवा बंडखोर आमदारांना शिवाजी पार्क मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्यास मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी नाकारण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बंडखोर आमदारांच्या गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील मोठे मैदान दसरा मेळाव्यासाठी आरक्षित केले आहे. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील अन्य मैदान आरक्षित करण्यासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. मात्र एमएमआरडीएने परवानगी नाकारली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत दसरा मेळाव्याचे शिवाजी पार्क मैदानातच आयोजन करायचेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. उभयतांमधील वाद विकोपाला जाऊ लागल्याने यंदा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यास कोणालाच परवानगी मिळण्याची शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेचा निर्णय विधी खात्याच्या अभिप्रायावर अवलंबून आहे.
शहर
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
महाराष्ट्र
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
गुन्हा
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!























Subscribe to my channel


