मुंबई उपनगरातील बोरिवलीमध्ये ४ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

मुंबई : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई उपनगरातील बोरिवलीमध्ये आज चार मजली इमारत कोसळली. बोरिवली पश्चिमेतील साईबाबा नगरमध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाने ही माहिती दिली. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, बचाव आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.

मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर परिसरात गीतांजली नावाची चार मजली इमारत आहे. ही इमारत काही वेळापूर्वी कोसळली. या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये १२ ते १५ रहिवासी अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान, या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बोरिवली परिसरातील गीतांजली ही तळ अधिक चार मजली इमारत कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला दुपारी साडेबाराच्या सुमारास मिळाली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि वार्डातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य आणि मदतकार्य हाती घेतले. या इमारतीत १२ ते १५ जण अडकल्याची माहिती मिळते. अद्याप या दुर्घटनेत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply