मुंबई:  ‘आता मिरवणुका जोरात काढा’; महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध गुढीपाडव्यापासून हटणार

मुंबई: कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध पूर्णपणे उठविण्यात आले नाहीत. येत्या २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हे निर्बंध उठवण्यात येतील, अशी चर्चा होत होती. अखेर याबाबतचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. महाराष्ट्र येत्या गुढीपाडव्यापासून कोरोनाच्या निर्बंधांपासून पूर्णपणे मुक्त होणार आहे. याबाबतची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की, आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा, असं त्यांनी म्हटलं आहे. सगळ्याच मंत्र्यांची अशी इच्छा होती की, राज्यातील निर्बंध काढून टाकण्यात यावेत. त्यानुसारच आज मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आता महाराष्ट्रातील निर्बंध मुक्त करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply