मुंबईत टेन्शन वाढले; कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ अवघ्या २४ तासांत पालटले चित्र

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली. अवघ्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ८५ रुग्ण आढळले. यापूर्वी १७ मार्च रोजी ७३ रुग्ण आढळले होते. दरम्यान, दिलासा देणारी बाब म्हणजे मंगळवारी आढळलेल्या ८५ नवीन कोरोना रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीत. तसेच कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळेमुंबई महापालिका सतर्क झाली आहे. या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पुढील दोन-तीन दिवस अशाच प्रकारे रुग्णसंख्या वाढली तर, आम्हाला धोरणांमध्ये बदल करावा लागेल, असे संकेत अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. रुग्णसंख्या वाढली तर, चाचण्या वाढवण्यात येतील. आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाचण्यांबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील नागरिकांना मास्क घालण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. मात्र, मास्क अनिवार्य करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, असं अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. रुग्णसंख्या आणि परिस्थिती बघूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असंही सांगण्यात आलं. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतरही मुंबई महापालिकेने चाचण्या बंद केलेल्या नाहीत. २६६ केंद्रांवर अजूनही चाचण्या केल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत दररोज सरासरी १० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply