मुंबईची चिंता वाढली; २ महिन्यांनंतर ‘ अशी ‘ आहे कोरोना परिस्थिती

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग (corona infection) आटोक्यात आला होता. मात्र, आज (corona new patient) मंगळवारी नव्या १०२ कोरोना रुग्णांची भर पडल्याने मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा हात पाय पसरले आहेत. २७ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मुंबईत (Mumbai) कोरोनाच्या सर्वाधीक रुग्णसंख्येची नोदं झालीय. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या १०,५९,४३३ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आज (zero corona death) एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे

त्यामुळे कोरोना मृत्यूंच्या संख्येत कोणताही बदल झाला नसून १९५६२ एवढ्यावरच रुग्णसंख्या राहिली आहे. तसंच रविवारी कोरोनाच्या ४५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसात ही रुग्णसंख्या दुपटीनं वाढली आहे. यावर्षी २७ फेब्रुवारीला १०३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. तसंच २ मार्चलाही १०० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply