मावळ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग

मावळ - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिवशाही बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खंडाळा घाटात मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या शिवशाही बसला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या बसमध्ये एकूण तीस प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

या अपघातामुळे काही काळ द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, वेळीच आग लागल्याचे लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळाली. बसला आग लागल्यानंतर चालकाने ही बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यामुळे बसमधील प्रवाशी खाली उतरले. अग्निशामक दलाच्या दोन गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *