मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यात ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

पुणे: राज्यभरात येत्या ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात येत्या ४८ तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिला आहे. ५ ते ११ ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईतही ७ आणि ८ ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सुनचं पुनरागमन होणार आहे. बंगालच्या उपसागरात येत्या ४८ तासात नवं कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता होणार आहे. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply