फक्त 20 रुपयांच्या प्रीमियमवर मिळवा 2 लाखांचा फायदा; कसं ते घ्या जाणून

Government schemes :  सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे.

वास्तविक केंद्र सरकार देशभरातील करोडो लोकांना विमा पॉलिसीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) देखील सुरू केली होती.

आता या दोन्ही विमा पॉलिसींच्या प्रीमियममध्येही वाढ करण्यात आली आहे. पीएम सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री विमा योजनेचे नवीन प्रीमियम दर 1 जून 2022 पासून लागू झाले आहेत. पीएम सुरक्षा विमा योजनेच्या प्रीमियममध्ये 67 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारची अशीच एक योजना आहे. तो घेणाऱ्यांना अत्यल्प दरात अपघात विम्याची सुविधा मिळते. तुम्ही महिन्याला 2 रुपयांपेक्षा कमी किमतीत अपघात विमा किंवा रु. 2 लाखांचा अपघाती कव्हरेज मिळवू शकता.

ही योजना 18 ते 70 वयोगटातील लोकांसाठी आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक प्रकारची अपघात विमा पॉलिसी आहे. ज्या अंतर्गत अपघाताच्या वेळी मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याच्या रकमेवर दावा केला जाऊ शकतो.

या योजनेंतर्गत विमा घेणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास, अशा परिस्थितीत त्याला सुरक्षा विमा म्हणून 2 लाख रुपये मिळू शकतात.

हे अपघाती कव्हरेज आहे. यामध्ये मृत्यू झाल्यास किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि अपघात झाल्यास 1 लाख रुपये उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध आहे.

या अंतर्गत, दरवर्षी 1 जून रोजी प्रीमियमची रक्कम बँकेतून आपोआप कापली जाते. तुम्हालाही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेला भेट द्यावी लागेल, येथे तुम्ही फॉर्म भरून अर्ज करू शकता.

या योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. यासोबतच बँकेत खाते असणेही आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेचा भाग होऊ शकता. ते एका वर्षासाठी वैध राहते. त्यानंतर तुम्हाला पुन्हा नूतनीकरण करावे लागेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply