पुणे : 7 कोटी द्या नाहीतर रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ म्हणणाऱ्या दोघांना अटक

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्या दोन आरोपींना पुणे रेल्वे पोलिसांनी वाघोलीतून अटक केली आहे. करण भिमाजी काळे आणि सुरत मंगतराम ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 3 मे ला दुपारी चार वाजता करण भिमाजी काळे आणि सुरत मंगतराम ठाकूर यांनी महेश कवडे या नावाने कंट्रोल रूमला फोन करून पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.

तसेच बॉम्ब कुठे ठेवला आहे. याची माहिती हवी असल्यास सात कोटी रुपये द्या अशी मागणी आरोपींनी पोलिसांकडे केली होती. ह्या घटनेच गांभिर पाहून पुणे रेल्वे पोलिसांनी तात्काळ बीडीडीएस आणि डॉग स्कोडच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन परिसर आणि एकूण येणाऱ्या-जाणाऱ्या 17 रेल्वे गाड्यांची झाडाझडती घेतली होती.

त्यानंतरही काही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने पोलिसांना धमकीचा कॉल खोटा असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात करण भिमाजी काळे आणि सुरत मंगतराम ठाकूर यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महेश कवडे नावाने धमकीचा फोन केल्याचे तपासात उघडकीस आलेला आहे. या प्रकरणात पुणे रेल्वे पोलिसांनी करण भिमाजी काळे आणि सुरत मंगतराम ठाकूर ह्या दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून, या दोन्ही आठ आरोपींना अटक केली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply