पुणे : शहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे पाणीपट्टीपोटी १०५ कोटी रुपयांची थकीत रक्कम असल्याची वस्तुस्थिती माहिती अधिकाराच्या तपशिलातून पुढे आली आहे. शंभर कोटींची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिका कधी प्रयत्न करणर, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांकडून विचारण्यात आला आहे. शहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे पाणीपट्टीची किती थकबाकी आहे, याचा तपशील सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे माहिती अधिकारात मागितला होता. त्यामधून ही बाब उघडकीस आली आहे.
वस्तू आणि सेवा करापोटीचे अनुदान येऊनही प्रवेश शुल्क आकारणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे (पुणे कटक मंडळ) ४७ कोटींची तर पाच लाख कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या संरक्षण खात्याकडे ४६ कोटींची पाणीपट्टी थकलेली आहे. प्लॅटफॉर्म तिकिटाची रक्कम अवाच्या सवा वाढविणाऱ्या रेल्वेकडे जवळपास पाच कोटींची थकबाकी आहे. याशिवाय टपाल कार्यालय, आकाशवाणी, बीएसएनएल या केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे तर सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), पोलीस, महावितरण आणि एमजेपी यांसारख्या राज्य शासनाच्या आस्थापनांकडेही लाखो रुपयांची थकबाकी आहे, अशी माहिती विवेक वेलणकर यांनी दिली. या सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांनी लक्ष द्यावे. पाणीपट्टीची थकबाकी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय आस्थापनांचा पाणीपुरवठा तोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणीपुरवठा बंद करून त्यांना पैसे भरायला भाग पाडले होते. अशीच कृती अन्य शासकीय कार्यालयांबाबत केल्यास सामान्य थकबाकीदार आणि शासकीय थकबाकीदार यांना महापालिका एकच न्याय लावते हा संदेश दिला जाईल.
शहर
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
महाराष्ट्र
- पालघर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा 'ब्रेकथ्रू'तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम पूर्ण; कामाला वेग!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य
























Subscribe to my channel




