पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला आग ; कात्रज-कोंढवा रस्त्यावरील घटना

पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला अचानक आग लागल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला कात्रज-कोंढवा रस्त्यावर सुंदरबन सोसायटीजवळ शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस लावण्यात आली होती. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास बसमधून अचानक धूर येऊ लागला. काही क्षणात बसने पेट घेतला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply