पुणे : वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीला केले गजाआड पाच आरोपी अटकेत

पुणे : सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरील वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या सिंहगड पोलिसांनी आवळल्या आहेत.विनोद शिवाजी जामदारे (वय -३२, रा. जाधवनगर, वडगांव), रोहीत विकास शिनगारे (वय - १९ रा. जुनी म्हाडा कॉलनी, हडपसर), विशाल विठ्ठल रणदिवे (वय- २२ रा. बार्शी, जि. सोलापुर), गौरव गंगाधर शिंदे, रा. मु.पो. ताडसौदने, ता. बार्शी जि . सोलापुर) नितीन सुरेश जोगदंड (वय - ३५, रा. अपर इंदिरा नगर, बिबवेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २०) सिंहगड पोलीसांचे पथक पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नवले पूल या ठिकाणी गस्त घालीत असताना कार्यरत असलेले पोलीस अंमलदार आणि अधिकारी यांना एका व्यक्तीने सांगितले कि, माझी चारचाकी गाडी असून; ती भाडेतत्त्वावर दिली आहे.  दीड वाजण्याच्या सुमारास हिंगणे चौकाजवळील आपना फॉर्मसी येथून भाडे पिकअप करणे करीता थांबलो होतो, त्यावेळी दोन इसमांनी येऊन मारहाण केली. तसेच गाडीमध्ये जबरदस्तीने ढकले. त्यानंतर  इतर साथीदारांना देखील बोलावले. गाडी हिंगणे विठ्ठलवाडी स्मशानभूमी नेवून सहा ते सात जणांनी मारहाण केली.

त्याच्याकडून रोख रक्कम, आणि मोबाईल काढून घेतले तसेच घरून ५० हजार रुपये मागवून देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच अंगावरील सगळे कपडे काढून टाकले. आणि त्याला विवस्त्र करून गाडीत घातले. आणि त्याला जबरदस्तीने घेवून जात होते. दरम्यान नावले पूलाकडूने कात्रजच्या दिशेने जात असतांना गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले. त्यानंतर चौकीत तक्रार संबंधित तक्रारदार देण्यासाठी जात असताना रस्त्यात पोलीस पेट्रोलींग गाडी भेटली. त्यावेळी पोलिस कर्मचार्‍यांना घडलेली घटना सांगितली.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांना सदर घटनेची माहिती देऊन त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस पथक व गुन्हे शोध पथकाच्या पथकाने कात्रज रस्त्यावरील वरील बी.पी च्या पेट्रोल पंपा समोर पळून जात असताना वरील आरोपींना ताब्यात घेतले. तसेच गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कादबाने करीत आहेत.    

सदरची कामगिरी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे,  पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, राहुल यादव, दिपक कादबाने, सहायक पोलीस उपनिरीक्षक कुरळे, उतेकर पोलीस हवालदार केकाण, अमित साळुंके, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर यांनी केली आहे .दरम्यान, विनोद जामदारे याचे विरुध्द सिहंगड रस्ता , दत्तवाड़ी, वारजे, माळवाडी येथे खून, दरोडा, खंडणी यासारखे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गौरव  शिंदे याचे बार्शी पो. ठाणे येथे खुनाचा प्रयत्न यासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. नितीन सुरेश जागदंड याचे विरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply