
पुणे : सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरील वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या सिंहगड पोलिसांनी आवळल्या आहेत.विनोद शिवाजी जामदारे (वय -३२, रा. जाधवनगर, वडगांव), रोहीत विकास शिनगारे (वय - १९ रा. जुनी म्हाडा कॉलनी, हडपसर), विशाल विठ्ठल रणदिवे (वय- २२ रा. बार्शी, जि. सोलापुर), गौरव गंगाधर शिंदे, रा. मु.पो. ताडसौदने, ता. बार्शी जि . सोलापुर) नितीन सुरेश जोगदंड (वय - ३५, रा. अपर इंदिरा नगर, बिबवेवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २०) सिंहगड पोलीसांचे पथक पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नवले पूल या ठिकाणी गस्त घालीत असताना कार्यरत असलेले पोलीस अंमलदार आणि अधिकारी यांना एका व्यक्तीने सांगितले कि, माझी चारचाकी गाडी असून; ती भाडेतत्त्वावर दिली आहे. दीड वाजण्याच्या सुमारास हिंगणे चौकाजवळील आपना फॉर्मसी येथून भाडे पिकअप करणे करीता थांबलो होतो, त्यावेळी दोन इसमांनी येऊन मारहाण केली. तसेच गाडीमध्ये जबरदस्तीने ढकले. त्यानंतर इतर साथीदारांना देखील बोलावले. गाडी हिंगणे विठ्ठलवाडी स्मशानभूमी नेवून सहा ते सात जणांनी मारहाण केली.
त्याच्याकडून रोख रक्कम, आणि मोबाईल काढून घेतले तसेच घरून ५० हजार रुपये मागवून देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच अंगावरील सगळे कपडे काढून टाकले. आणि त्याला विवस्त्र करून गाडीत घातले. आणि त्याला जबरदस्तीने घेवून जात होते. दरम्यान नावले पूलाकडूने कात्रजच्या दिशेने जात असतांना गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले. त्यानंतर चौकीत तक्रार संबंधित तक्रारदार देण्यासाठी जात असताना रस्त्यात पोलीस पेट्रोलींग गाडी भेटली. त्यावेळी पोलिस कर्मचार्यांना घडलेली घटना सांगितली.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांना सदर घटनेची माहिती देऊन त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस पथक व गुन्हे शोध पथकाच्या पथकाने कात्रज रस्त्यावरील वरील बी.पी च्या पेट्रोल पंपा समोर पळून जात असताना वरील आरोपींना ताब्यात घेतले. तसेच गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कादबाने करीत आहेत.
सदरची कामगिरी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, राहुल यादव, दिपक कादबाने, सहायक पोलीस उपनिरीक्षक कुरळे, उतेकर पोलीस हवालदार केकाण, अमित साळुंके, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर यांनी केली आहे .दरम्यान, विनोद जामदारे याचे विरुध्द सिहंगड रस्ता , दत्तवाड़ी, वारजे, माळवाडी येथे खून, दरोडा, खंडणी यासारखे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गौरव शिंदे याचे बार्शी पो. ठाणे येथे खुनाचा प्रयत्न यासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. नितीन सुरेश जागदंड याचे विरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




