
नागपूर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पोलीस पथकाच्या(एसआयटी) माध्यमातून करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. त्याचप्रमाणे आंतरधर्मीय विवाहामध्ये तरुणींचा होणारा शारीरिक आणि मानसिक छळ रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. वालकर यांच्या हत्येप्रकरणी लहू कानडे, अबू आझमी, अतुल भातखळकर आदींनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. श्रद्धा वालकरची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात ४० हून अधिक मोर्चे निघाले. विविध मोठय़ा १५ हून अधिक संघटनांनी त्यात सहभाग घेतला. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.
वालकर हिने तिचा प्रियकर आफताब पुनावाला याच्याकडून मारहाण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती, मग गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही. दोन्ही कुटुंबाला बोलावून जे लेखी घेण्यात आले त्याला एक वर्ष उशीर का झाला. त्या कागदावर तारखेत खाडाखोड करण्यात का आली, असे प्रश्न उपस्थित करीत आशीष शेलार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्यावर श्रद्धाने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल पोलिसात तक्रार दिली होती. महिन्याभराने नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. या प्रकरणी कोणाचा दबाव होता का, याची विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल. तसेच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा कार्यवाही अहवाल मांडला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आंतरधर्मीय विवाहाला कोणाचा विरोध नाही. मात्र, जाणीवपूर्वक एका षडय़ंत्राचा भाग म्हणून असे विवाह काही जिल्ह्यांत होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात काही राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करून अधिक प्रभावी कायदा करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील महिलांची छेडछाड, अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. केंद्रीय कायद्याचा अधिक्षेप करून आपण तो कायदा केला आहे. विविध विभागांचे म्हणणे त्यामध्ये विचारात घ्यावे लागते. यासंदर्भात राज्य शासन पाठपुरावा करत असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.
शहर
- शिरूर : पिंपरखेडच्या सौम्या वरे आणि आयुष केदारीची नवोदय विद्यालयात निवड; मराठी शाळांचा दबदबा कायम
- दिव्यांगांच्या हक्काच्या निधीला प्रशासकीय खो! रायगडमधील रासळ ग्रामपंचायतीविरोधात उद्यापासून दिव्यांगांचे सामूहिक उपोषण
- पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! पुण्यात 'या' दिवशी धडकणार मान्सून; हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
महाराष्ट्र
- शिरूर : पिंपरखेडच्या सौम्या वरे आणि आयुष केदारीची नवोदय विद्यालयात निवड; मराठी शाळांचा दबदबा कायम
- दिव्यांगांच्या हक्काच्या निधीला प्रशासकीय खो! रायगडमधील रासळ ग्रामपंचायतीविरोधात उद्यापासून दिव्यांगांचे सामूहिक उपोषण
- पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! पुण्यात 'या' दिवशी धडकणार मान्सून; हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
गुन्हा
- मुंबई: बीकेसीमध्ये धावणार देशातील पहिली 'पॉड टॅक्सी'! स्वप्न की वास्तव? प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह.
- बीड हादरले! तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, फोटो-व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेलिंग; अंबाजोगाई परिसरातील धक्कादायक प्रकार
- पुण्यात थरार! महिलेशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण; दिवेघाटात सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून सुटका.
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
इतर
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
- दैनिक राशिभविष्य ७ जून २०२६: आज कोणत्या राशींवर असेल गणपती बाप्पाची कृपा? जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- भंडारा: वैनगंगा नदीत बोट उलटून दोन तरुणांचा बुडून मृत्यू; पाच जण सुदैवाने बचावले!
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
- वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रोटोटाइप लांबणीवर; आता डिसेंबर २०२६ मध्ये होणार लोकार्पण!
- नवी दिल्ली: सीबीएसईच्या निकालांच्या पोर्टलवर परदेशातून सायबर हल्ला! केंद्रीय यंत्रणा सतर्क; विद्यार्थ्यांच्या डेटाची सुरक्षा सुरक्षित
























Subscribe to my channel



