पुणे: ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे…’, महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंचा सल्ला

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. पण अखेर वसंत मोरे यांनी काल (शनिवारी) कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली. या महाआरतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण राज ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. काल मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. असं असताना ते वसंत मोरे यांच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आज मनसे नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचं पुण्यातील निवासस्थान राजमहाल याठिकाणी ही भेट झाली. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना मोरे म्हणाले की, “राज साहेब ठाकरे काल पुण्यात येणार असल्याचं मला माहीत नव्हतं. तुमच्या प्रसार माध्यमांमुळेच साहेब पुण्यात येणार असल्याची माहिती मला मिळाली. पण त्यापूर्वीच मी महाआरतीचं आयोजन केले होतं. त्याबद्दल राज ठाकरेंना मेसेज करून कळवलं होतं. तसेच या महाआरतीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या महाआरतीनंतर आज राज ठाकरे यांची पुण्याच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीबाबत बोलताना वसंत मोरे यांनी पुढे सांगितलं की, “आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींबाबत चर्चा झाली. काल झालेल्या महाआरतीचं साहेबांनी कौतुक केलं. तसेच साहेबांना काल येता आलं नाही. पण ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येतो,’ असा सल्ला त्यांनी दिला. तसेच राज ठाकरेंना आणखी एका कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे. साहेब निश्चित लवकरच येतील, त्या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करणार आहे, असंही मोरे यावेळी म्हणाले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply