
Solapur News : नवीन वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात ट्रक चालक आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल-डीझेलची टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात पेट्रोल-डिझेल टँकर चालक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर, सोलापुरातील हिंदुस्तान पेट्रोलियम येथील डेपो मधील टँकर चालकांनी संप पुकारला होता. मात्र, पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे. तर, वाहतूक सुरु केली असली तरीही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे.
नवीन वाहन कायद्याला विरोध करत सोलापुरातील हिंदुस्तान पेट्रोलियम येथील डेपो मधील टँकर चालकांनी संप पुकारला होता. प्रत्येक अपघातामध्ये केवळ वाहन चालकांना दोषी ठरवले जाते, अनेक वेळा चूक समोरच्याची असते. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. चालकांना केवळ दहा ते पंधरा हजार रुपये पगार असतो, अशी परिस्थिती असताना लाखो रुपयांचा दंड कसा भरायचा? असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे. तर, सोलापुरातील तीन पेट्रोल-डिझेल डेपोवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. रस्त्यातही पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, पोलिसांच्या बंदोबस्तात इंधन वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने सोलापूरसह 6 जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पुरवठा सुरु झाला आहे.
|
|
संपाला रुग्णवाहिका चालकांचा पाठिंबा
नवीन वाहतूक कायद्याविरोधात वाहनचालकांनी पुकारलेल्या संपास सोलापुरातील रुग्णवाहिका चालकांनी देखील पाठींबा दिला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत असल्याने रुग्णवाहीका चालक संपात सहभागी होणार नाहीत. शासनाने वाहन चालकांच्या भूमिका लक्षात घेऊन संपावर तोडगा काढावा अशी मागणी सोलापुरातील रुग्णवाहिका चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अनेक पेट्रोल पंपावर गर्दी...
नवीन वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम कालपासून सोलापुरात देखील पाहायला मिळाले. सोलापूर शहरातील पेट्रोल पंपांवरती वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सोमवारी रात्री दिसून आले. पेट्रोल मिळणार नाही या भीतीने वाहन चालक टाकी फुल करून घेत असल्याचे पाहायला मिळत होते. दरम्यान, आज सकाळी देखील काही ठिकाणी अशीच गर्दी होती. मात्र, असे असतानाच आता पोलिसांच्या पुढाकाराने सोलापुरात इंधन टँकर चालकांनी संप मागे घेतला असल्याने इंधन टंचाई निर्माण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




