
लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक केली. मोहम्मद जुनेद खान (वय २४, रा. दापोडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून दहशतवादी कारवाई करणयासाठी त्याला जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पैसे पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जुनेद गेल्या काही महिन्यांपासून समाजमाध्यमातून जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यावर एटीएसच्या पथकाने दापोडीतून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
जुनेद कोण ?
जुनेद मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी असून गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. या पूर्वी देशभरात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरुन पुण्यातील काहीजणांना अटक करण्यात आली होती.
पुण्यातील तरुणांचे दहशतवादी संघटनांशी संबंध
बंदी घातलेल्या इंडियन मुजाहिदीन संघटनेकडून देशभरात बाँबस्फोट घडविण्यात आले होते. बाँबस्फोटाचा कट तसेच इंडियन मुजाहिदीनच्या कारवायांचा प्रचार करण्यासाठी पुण्यातील कोंढवा भागात एक केंद्र चालविण्यात येत होते. या केंद्रावर मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील अतिरिक्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी छापा टाकला होता. तेव्हा दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील काहीजण गुंतल्याचे उघड झाले होते.
मध्यंतरी राष्ट्रीय तपास संस्थेने पुण्यातील एका तरुणीला अटक केली होती. हे तरुणी गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले होते. जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता तसेच फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवादी संघटनांनी बाँबस्फोट घडवून आणले होते. देशभरात झालेल्या बाँबस्फोट प्रकरणात पुण्यातील मोहसीन चौधरीचा हात असल्याचे उघडकीस आले होते. कोंढव्यात राहणाऱ्या मोहसीन चौधरी याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



