पुणे: राज ठाकरेंच्या दौर्यासाठी आशिर्वाद देण्यासाठीआलेल्या शेकडो पुरोहितांकडून गो हत्याबंदीची घोषणा

पुणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौर्याची सुरवात आज सकाळी पुण्यातून झाली. राज ठाकरे यांना आशिर्वाद देण्यासाठी आलेल्या शेकडो पुरोहितांनी 'गो हत्या बंद हो... अधर्म का नाश हो... धर्म की जय हो...' असा घोषणा दिल्या.

राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्यापूर्वी राज ठाकरे हे पुण्यात मुक्कामी होते. आज सकाळी (ता.३०) नऊच्या सुमारास ठाकरे हे दौर्यावर निघणार असल्याने त्यांच्या 'राजमहाल' या निवासस्थानातूनिवासस्थाना बाहेर सकाळी साडेसात पासून कार्यकर्ते, पुरोहित एकत्रित आले. निवासस्थानाखाली सुमारे १०० पुरोहितांनी आयुष्य वाढावे, कार्यामध्ये यश मिळावे यासाठी सुक्त पठण व मंत्रोच्चाराचे पठण सुरू केले.

मनसेचे कार्यकर्ते डोक्यावर भगवी टोपी, हातात झेंडे हजर होते. त्यांनीही घोषणाबाजी केली. सुमारे दीड तास पुरोगामींकडून शांती मंत्र व इतर मंत्रांचे पठण केले. सकाळी नऊच्या सुमाराज राज ठाकरे हे घरातून बाहेर पडले. त्यावेळी उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. ठाकरे यांना पुरोहितांनी भगवी शाल पांघरूण, गंध लावून आशिर्वाद दिले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हिंदूजननायक, हिंदूह्रदय सम्राट राज ठाकरे की जय, जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणा दिल्या. तर पुरोहितांनी गो हत्या बंद करो, धर्म की जय, अधर्म का नाश हो.. भारत माता की जय, हिंदू धर्म की जय.. अशा घोषणा दिल्या. ठाकरे ज्यांच्या वाहनांतून जात असताना त्यांच्यावर गुलाबपुष्प उधळून निरोप देण्यात आला. राज ठाकरे यांच्या सोबत सुमारे ४० गाड्यांमधून पदाधिकारी, कार्यकर्ते औरंगाबादला निघाले आहेत.

ठाकरे यांच्या औरंगाबाद दौर्याची पुण्यामधील लगबग सुरू असताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे यावेळी अनुपस्थित होते. मनसेचे मुंबई व पुण्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी ठाकरे यांच्यासोबत औरंगाबादला निघाले, पण त्यामध्ये वसंत मोरे यांचा समावेश नव्हता. राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध करत मी भोंगे लावणार नाही अशी भूमिका मोरे यांनी घेतल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून काढण्यात आले. त्यानंतरही मोरे पक्षात सक्रिय नाहीत अशी चर्चा सुरू असताना आज ते अनुपस्थितीत होते.दरम्यान, वसंत मोरे हे आजारी असल्याने येऊ शकले नाहीत अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply