पुणे महापालिकेत पुढील महिन्यात नोकर भरती – विक्रम कुमार

पुणे - पुणे महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढील महिन्यात भरती प्रक्रिया (Recruitment Process) राबविली जाणार आहे. त्यासाठी अतिरीक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी सोमवारी दिली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी प्रशासक तथा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ते म्हणाले, ‘‘महापालिकेत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यासाठी बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती प्रत्येक विभागतील रीक्त पदांची माहिती एकत्रित करेल. त्यानंतर प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत, ती कोणती पदे आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रीया परीक्षा पद्धतीनेच केली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेला नियुक्त करायचे का, त्यासाठीची प्रश्‍नपत्रिका कोणी तयार कराययाची, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुढील महिन्यात भरतीची प्रक्रिया राबविऱ्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

पीएमपीकडे सध्या काही पदे जास्त आहे. यामध्ये काही चालक आणि लिपिक यांचा समावेश आहे. कायम पदावरील सेवकांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यासंदर्भातही विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले.

सभेत घेण्यात आलेले निर्णय

  • पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पेारेशन लिमिटेडला महापालिकेच्या वाट्याची सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी देणार
  • खासगी रूग्णालय आणि शुश्रुषागृहांच्या परवाना आणि नुतनीकरणाच्या शुल्कात वाढीच्या प्रस्तावाला मंजूरी
  • औध येथे उभारण्यात येणाऱ्या पशुधन रुग्णालयासाठी तीन कोटी रुपयांच्या वर्गीकरणास मान्यता
  • नगररोड व वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झाडणकामासाठी कंत्राटी कामगार पुरविण्याच्या सुमारे ४ कोटी ९१ लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply