पुणे : भाईगिरी करणाऱ्या तरुणांना वेसण घालणार तरी कधी

पुणे : शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेलं शहर मात्र गेल्या काही दिवसांपासून या शहराला एक डाग लागलाय आणि तो म्हणजे गुन्हेगारीचा. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रकरणं या मध्ये वाढ होताना दिसतेय. खून, चोऱ्या, दरोडे इतकंच काय तर तरुणाई मधली भाईगिरी देखील वाढतेय.पुण्यातील बालाजी नगर परिसरातून अशीच घटना समोर येत आहे. परिसरातील काही मुलं चक्क हातात कोयते घेऊन नागरिकांना धमकावत आणि मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे.,

पुण्यातील बालाजी नगर मध्ये असेच प्रकार वारंवार समोर येतायत. हातात कोयते घेऊन नागरिकांना भर रस्त्यात मारहाण करणे. एवढंच नाही तर फुकट भाजी दिली नाही म्हणून भाजीवाल्यांना मारहाण करणे असे गुन्हेगारीचे सत्र इथे सुरूच आहे. हे सर्व प्रकार करताना व्हिडिओ काढायची आणि दहशत पसरावी म्हणून चक्क व्हिडिओ देखील काढण्यात आले आहेत. मारहाण,धमक्या देणे,परिसरात दहशत पसरवणे,मुलींची छेड काढणे अशे प्रकार सर्रास सुरु आहेत. या संदर्भात नागरिक जेव्हा तक्रार देण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये जातायत तिथे मात्र त्यांना निराशाच मिळतेय. इतकंच काय तर तुम्ही या परिसरात राहू नका असे उलट उत्तर पोलिस देत असल्याचे नागरिकांना सांगितलंय.

वारंवार या गोष्टी इथे होत असल्याने पोलिस दल अँक्शन मोड मध्ये गेलेलं दिसतंय. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर सहआयुक्त, पोलीस उपायुक्त, एसीपी असे सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी सहकारनगर पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसलेत अशी माहिती समोर आलोय.

या गुंडापैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.... या टोळीतील काही गुंडांवर याआधीच तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे. या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी सांगितले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply