पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडून सिमेंट पुरवठादाराला जीवे मारण्याची धमकी

पुणे : बांधकाम व्यावसायिकाने सिमेंट पुरवठादार व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. न्यायालयाच्या आदेशाने बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी निर्मिती डेव्हलपर्सचे पंढरीनाथ सुभाष म्हस्के, संतोष सुभाष म्हस्के (दोघे रा. नऱ्हे, सिंहगड रस्ता) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश शिवनारायण भुतडा (वय ४२, रा. सेनापती बापट रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निर्मिती डेव्हलपर्सला भुतडा यांनी सिमेंट पुरवठा केला होता. सिमेंट पुरवठा केल्यानंतर त्यांना ३६ लाख ४७ हजार रुपये म्हस्के यांनी दिले नाहीत. त्यामुळे भुतडा यांच्या म्हस्के यांच्या बांधकाम कंपनीच्या कार्यालयात गेले. त्यांनी पैशांची मागणी केली. तेव्हा म्हस्के यांनी भुतडा यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. भुतडा यांनी न्यायालयात खासगी तक्रार दिली होती. न्यायालयाने या प्रकरणात भुतडा यांच्या तक्रारीची दखल घेऊन चतु:शृंगी पोलिसांना गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *