पुणे – पत्नीला आणण्यासाठी माहेरी गेलेल्या पतीस मेव्हण्याने चोपले

पुणे - माहेरी आलेल्या पत्नीला पुन्हा घेऊन जाण्यासाठी पती आपल्या सासरी आले. तेव्हा मेव्हण्याने घरी का आला या कारणावरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. ही घटना कोंढव्यातील भीमनगरमध्ये रविवारी दुपारी ३ वाजता घडली.

याप्रकरणी पिंपरीत राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या पतीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची पत्नी कोंढव्यातील भीमनगर येथील तिच्या माहेरी आली होती. तिला घेण्यासाठी फिर्यादी हे रविवारी तेथे गेले. तेव्हा त्यांच्या मेव्हण्याने फिर्यादी यांना घरी का आला, या कारणावरुन तुझी रिक्षा जाळतो, असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्यांच्या डाव्या डोळ्यास व पाठीला जखम झाली आहे, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

 


शहर

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *