पुणे : नाताळाच्या मध्यरात्री महाविद्यालयीन युवतीचा अपघातात मृत्यू; पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात; दुचाकीस्वार मित्र अटकेत

पुणे : मित्राबरोबर नाताळ साजरा करण्यासाठी दुचाकीवरुन फिरायला गेलेल्या सहप्रवासी तरुणीचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैराेबानाला परिसरात मध्यरात्री घडली. या प्रकरणी तरुणीच्या दुचाकीस्वार मित्रास वानवडी पोलिसांकडून अटक करण्यात आली.

व्यंकटप्रसन्ना श्रीनिवास विपुरी (वय २२ रा. रामनगर, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार मित्र विल्सन मार्रीश पिल्ले (वय २२ रा. हेवन पार्क, महमंदवाडी ) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत व्यंकटप्रसन्नाची लहान बहीण सुषमा विपुरी (वय १९ रा. मुंढवा) यांनी तक्रार दिली आहे. व्यंकटप्रसन्ना एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. नाताळाच्या मध्यरात्री व्यंकटप्रसन्ना आणि तिचा मित्र विल्सन नाताळ साजरा करण्यासाठी दुचाकीवरुन बाहेर फिरायला पडले. भैराेबानाला परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार विल्सन याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. सहप्रवासी व्यंकटप्रसन्ना पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार विल्सन याला अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक राहुल गिरमकर तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply