पुणे: धायरीत हॉटेल व्यवस्थापकाचा खून करणारे गजाआड; प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे उघड

पुणे: हॉटेल व्यवस्थापकाचा खून प्रकरणाचा छडा लावण्यात सिंहगड पोलिसांना यश आले. हॉटेल व्यवस्थापकाचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अनिकेत अरूण मोरे (वय २५, रा. धायरी), धीरज शिवाजी सोनवणे (वय १९), सनी उर्फ योगेश हिरामण पवळे (वय १९, रा. दोघे. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भरत कदम असे खून झालेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे. कदम नऱ्हे येथील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. दोन दिवसांपूर्वी ते मध्यरात्री कामावरून घरी जात असताना धायरी भागात मोरे आणि साथीदारांनी कदम यांना अडविले. त्यांच्यावर कोयत्याने वार करून खून केला.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास सुरू केला. आरोपी धायरीतील धायरेश्वर मंदिराजवळ लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. चार ते पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणातून मोरे आणि कदम यांच्यात वाद झाले होते. मोरे, त्याचा मावसभाऊ साेनवणे यांनी कदम यांचा खून करण्याचा कट रचल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक सचिन निकम, दीपक कादबाने, आबा उत्तेकर, सुनील चिखले, अमेय रसाळ, देवा चव्हाण, गणेश झगडे आदींनी ही कामगिरी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply