पुणे : देशभक्तीपर गाणी गात विद्यार्थ्यांची मेट्रो सफर

झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा… ए वतन मेरे आबाद रहे तू… हम होंगे कामयाब… अशी देशभक्तीपर गाणी पुणे मेट्रोमध्ये गात तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशाला शनिवारी अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.  

नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ॲाफ इन्स्टिटयूटमधील चार विभागांतील प्रत्येकी ७५ विद्यार्थी या प्रमाणे एकूण ३०० विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मेट्रोची सफर घडवण्यात आली. विद्यार्थ्यांनी वनाझ ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर मेट्रोतून प्रवास केला. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, पुणे मेट्रोचे मनोजकुमार डॅनियल, दीपक पिल्ले आदी उपस्थित होते.  

सार्वजनिक वाहतुकीतील मेट्रोचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात संस्थेतील विद्यार्थ्यांना मेट्रोची सफर अनुभवता येण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे अ‍ॅड. जाधवर यांनी सांगितले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *