पुणे: दस्त नोंदणी कार्यालयांतील असुविधांमुळे नागरिक हैराण

पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी-विक्री करण्यासाठी पुणेकरांची दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे. मात्र, शहरातील अपवाद वगळता बहुतांश कार्यालयांत दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी जागा नाही, पिण्याचे पाणी, चांगली स्वच्छतागृहे नाहीत. तसेच अनेक दुय्यम निबंधक कार्यालयांत दुय्यम निबंधक सुट्या घेतात, पर्यायी मनुष्यबळ नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे उपलब्ध नाही. या असुविधांमुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

वस्तू व सेवा करानंतर राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग अशी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. राज्याच्या तिजोरीत पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महसूल जातो. मात्र, शहरातील अपवाद वगळता बहुतांश कार्यालयांत दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, चांगली स्वच्छतागृहे, बसण्यासाठी जागा अशा सुविधा नाहीत.

याबाबत बोलताना असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटस संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले, की शहरातील काही दस्त नोंदणी कार्यालयांतील दुय्यम निबंधक सुट्या घेतात अतिरिक्त दुय्यम निबंधक उपलब्ध नसल्याचे असे सहजिल्हा निबंधकांकडून सांगितले जाते. शहरातील २८ दस्त नोंदणी कार्यालयांपैकी काही कार्यालये वगळता सारखीच परिस्थिती आहे. राज्याला महसूल भरणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी जागा नाही, स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आतापर्यंत नोंदणी महानिरीक्षक, सहजिल्हा निबंधक यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार करूनही फरक पडलेला नाही.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply