पुणे – चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच मला, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, पिडीतेचा गौप्यस्फोट

पुणे - शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर जोरदार हल्ला चढविणाऱ्या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला जीवे मारण्याची धमकी देऊन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा गौप्यस्फोट रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीत तरुणीने मंगळवारी केला. इतकेच नव्हे, तर आजपर्यंत सगळे जबाब वाघ यांच्या सांगण्यावरुनच दिल्याचेही तिने नमूद केले आहे. हा गौप्यस्फोट चित्रा वाघ यांच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पिडीतेच्या गौप्यस्फोटानंतर पुणे पोलिसही "ऍक्‍शन मोड'वर आले असून पिडीतेला कायदेशीर सहकार्य करणार असल्याची भुमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे.

शिवसेनेचे नेते व राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार करुन गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या प्रकरणानंतर चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्याविरुद्ध रान पेटविले होते. पिडीत तरुणीच्या जीवाला धोका असल्यापासून ते ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तसेच तिचे अपहरण झाल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे जाऊन हा सर्व प्रकार कथन केला होता. कुचिक यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळाल्यावरही वाघ यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यासाठी वाघ यांनी पुण्यातील भाजप कार्यालयामध्ये दोनदा पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर आरोप केले होते. त्याचबरोबर कुचिक व संबंधीत तरुणीमध्ये झालेले मोबाईल चॅट पुढे आणून कुचिक यांच्यासह पुणे पोलिस व महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते.

दरम्यान, पिडीत तरुणीने मंगळवारी सकाळी "साम टिव्ही'ला मुलाखत देत तिच्याबाबत आत्तापर्यंत घडलेला घटनांना चित्रा वाघ व त्यांचे सहकारीच कसे जबाबदार आहेत, याचा पाढा वाचला.

पिडीत तरुणी म्हणाली, 'मी सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविल्याने त्यांच्याकडे चौकशीकामी जात होते. मी उरुळी कांचन इथे आले, त्यावेळी पवार नावाच्या व्यक्तीने एक पत्र माझ्या हातात दिले. त्याने ते पत्र मला कुचिक यांनी दिल्याचे पोलिसांना सांग असे सांगितले. त्या पत्रामध्ये मी हे प्रकरण मागे न ऐकल्यास ते मला जीवे मारुन टाकतील' असा उल्लेख कुचिक यांच्या नावाने केल्याचे दिसले. प्रत्यक्षात कुचिक यांनी असे पत्र पाठविले नाही आणि मला धमक्‍याही दिल्या नाहीत.'

पिडीत तरुणी वाघ यांच्याबाबत म्हणाली, 'मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत कुचिक व माझे काही चॅट पुढे आणले. प्रत्यक्षात त्यांनी सादर केलेले चॅट मी किंवा कुचिक यांनी मला कधीही पाठविले नव्हते. असे चॅट त्यांनी कुठून आणले, हे मला कळले नाही. मुंबईतील एक व्यक्ती मला वडीलांसारखे होती. मी गरोदर असल्याचे त्या व्यक्तीला कळले. तेव्हा ते मला भेटायला आले. त्यानंतर त्यांनी माझा उपयोग करुन कुचिकांकडे विविध मागण्या करण्यास सुरुवात केली. ते कुचिक यांच्याशी सुडटबुद्धीने वागुन माझा वापर करीत होते. त्यांनी कुचिकांवर जबरदस्तीने गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मोहम्मद अहमद, रोहित भिसे व चित्रा वाघ या तिघांनी मिळून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply