पुणे : खडकवासला बॅक वॉटरमध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू

किरकटवाडी: खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला खडकामध्ये असलेल्या डोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून घटनास्थळी उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. विजय नागनाथ रोकडे (वय 24, रा. बराटे चाळ, वारजे) आणि रॉबीन (अंदाजे वय 20, पुर्ण नाव माहीत नाही, रा. रामनगर, वारजे) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विजय आणि त्याचा मित्र रॉबीन हे काल दि. 1 एप्रिल रोजी सकाळी घरातून गेले होते. आज सकाळी धरणाच्या भिंतीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना खडकावर कपडे व बूट दिसले. आजूबाजूला कोणी न दिसल्याने याबाबत त्यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, पोलीस हवालदार पंढरीनाथ कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल चेतन बराटे, गजानन चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply