पुणे - महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराज, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने अनेक उद्योजक शून्यातून उभे राहिले. अनेक उद्योजक कुठलीही पार्श्वभूमी नसताना अभ्यास, जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर उभे राहिले. देशाला दिशा देण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशाचे नेतृत्व करू शकतो. आपण सर्व उद्योजकांच्या प्रयत्नांतून मजबूत अर्थव्यवस्था उभी करू, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी येथे व्यक्त केला. ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने ‘ब्रँडस ऑफ महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत राज्यातील ६३ उद्योजकांचा गुणगौरव ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला शुभ संदेश दिला. पवार म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. शून्यातून कर्तृत्वाचे डोंगर उभे करणारे अनेक उद्योजक महाराष्ट्रात होऊन गेले. यशवंतराव चव्हाण यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले. शेतीबरोबर उद्योगाचा वर्ग कसा तयार करता येईल व त्यासाठी काय मदत करता येईल, यासाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. एमआयडीसी, सिडको, म्हाडा यांसारखी महामंडळे उभी केली. महाराष्ट्राच्या उभारणीत ही महामंडळे उपयुक्त होती. हे करताना राजकीय धोरण त्यांनी कधी ठेवले नाही. महाराष्ट्र उभारणीची सुरूवात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयामुळे झाली. वसंतराव नाईक यांनाही ११ वर्षे मिळाली, आम्ही सर्वांनी योगदान दिले.’’
काही कर्तृत्ववान उद्योजक या राज्यात आधीच होती. त्यांचा आदर्श आणि वारसा अनेकांनी जपला. सोलापुर येथील कापडाचे व्यापारी वालचंदशेठ यांनी इंदापूर तालुक्यातील एका खेड्यात गुळाऐवजी साखरेचा कारखाना उभा केला. अनेक प्रकारची कारखानदारी त्यांनी दूरदृष्टी व कष्टाच्या जोरावर उभी केली. त्यांच्या कष्टाचे कौतुक वाटते, त्यांनी कापड व्यापार करतानाच बंगलोर येथे विमान निर्मिती बनविणारी कंपनी उभी केली. राजर्षी शाहू महाराज यांनी शंतनू किर्लोस्कर यांना नांगराचे फाळ बनविण्यासाठी तोफ दिली. बी. जी. शिर्के यांनी बालेवाडी क्रीडा संकुल आव्हान स्वीकारून सहा महिन्यात उभे केले. ते ही सातारा जिल्ह्यातील पसरणी या छोट्या गावातून आलेले. शिर्के यांच्यासारखे अनेक उद्योजकांनी पार्श्वभूमी नसताना कष्ट, जिद्द, चिकाटीच्या जोरावर उद्योग उभे केले. मुंबई आता उद्योगनगरी न राहता सेवा देणारी नगरी झाली आहे, असे पवार यांनी सांगितले. मुंबईत बिकेसी येथे प्रयत्नपूर्वक अर्थ केंद्र व हिरे उद्योगाचे केंद्र उभे केल्याचेही त्यांनी सांगितले. ‘सकाळ’चे संचालक-संपादक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. भूषण करंदीकर आणि वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले.
‘सकाळ’च्या कार्याने तरुणांना प्रेरणा पिंपरी-चिंचवड येथे यशवंतराव चव्हाण यांनी जाणीवपूर्वक औद्योगिक वसाहत उभी केली व त्या ठिकाणी जेआरडी टाटा यांना निमंत्रित केले. मगरपट्टा सिटी येथे एक लाख कामगार काम करतात. कर्तृत्ववान उद्योजक उभे राहिल्याने आयटी क्षेत्रात महाराष्ट्र काम करू शकला. महाराष्ट्र साखरेचे उत्पादन करणारे एकमेव राज्य आहे. उसापासून साखरेबरोबर इथेनाॅल, वीज निर्मिती करू लागलो. चितळे यांचे दुग्धजन्य पदार्थ बनविण्यात देशात नाव पोचले. त्यांचे अनुकरण अनेकांनी केले. अॅग्रोबेस उद्योगही पुढे आले आहेत. ज्या उद्योजकांचे कर्तृत्व आहे, त्यांचे कौतुक, सन्मान होणे गरजेचे आहे. हे काम ‘सकाळ’ने केले आहे. तुमच्या कार्याची अन्य तरुण प्रेरणा घेतील आणि देशाला दिशा मिळेल, असा आशावाद शरद पवार यांनी व्यक्त केला.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



