पुणे : अचानक इलेक्ट्रिक बाईकला लागली आग

विश्रांतवाडी : धानोरी-लोहगावयेथील पोरवाल रस्त्यावरील प्राईड स्प्रिंग सोसायटीजवळ दुपारी अचानक इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागली. या घटनेत ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. आग लागण्याचे नेमकं कारण समजू शकलं नाही. घटना घडली त्या ठिकाणाच्या जवळच असलेल्या दुकानातील अग्निशामक साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. परंतु आग विझवण्यात यश मिळाले नाही.सकाळी व संध्याकाळी हा रस्ता खूपच गजबजलेला असतो.दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर गर्दी कमी होती. त्यामुळे जीवितहानी घडली नाही.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA), भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहर्ष दमाणी यांनी स्कूटरच्या थर्मल रनवेला आग लागल्याची शंका व्यक्त केली. आमच्या एका स्कूटरसोबत घडलेल्या पुण्यातील घटनेबद्दल आम्हाला माहिती आहे आणि त्याचे मूळ कारण समजून घेण्यासाठी आम्ही तपास करत आहोत आणि पुढील काही दिवसांत आणखी अपडेट्स शेअर करू."ओलामध्ये वाहनांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही ही घटना गांभीर्याने हाताळू आणि योग्य ती कारवाई करू "असे ओलाच्या निवेदनात म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply