परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाला गालबोट; मतमोजणीवरून दोन गटात तुफान दगडफेक,

परभणी : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतमोजणी होत आहे. निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत बऱ्याच ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून विजयी उमेदवार जल्लोष साजरा करत आहेत. दरम्यान, परभणीत मतमोजणी सुरू असताना दोन गटात तुफान दगडफेक झाली असल्याची माहिती आहे.

या दगडफेकीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील वाडी दमई येथे ही घटना घडली आहे. येथील ग्रामपंचायतीच्या निकालाची मतमोजणी सुरू असताना दोन गटात बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेले की दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली.

दरम्यान, या दगडफेकीत चार जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दगडफेकीची पोलिसांना कोणतीही कल्पना नव्हती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत दोन्ही गटाच्या लोकांना पांगवून लावलं. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून वातावरण तणावपूर्ण असले तरी शांतता आह़े.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्‍यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकत्‍र्याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे.

यामुळे गावात दंगलीसारखी परिस्‍थती निर्माण झाली होती. या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज श्रीराम माळी (वय ३२) या भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्‍याची माहिती आहे. घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी व प्रचंड आक्रोश केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply