पुणे : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली लाच मागणाऱ्या हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली लाच मागितल्याचा आरोपावरून ग्रामीण पोलिसांच्या शिक्रापूर पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला. अमीरुद्दीन रफीउद्दीन चमनशेख ( वय ४३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

अमीरुद्दीन विरुद्ध जुलै महिन्यात तक्रार करण्यात आली होती. त्याबाबत पडताळणी करून हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. चमनशेख शिक्रापूर पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाइल संच द्यायचे असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे लाच मागितली होती. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली. तांत्रिक विश्लेषण आणि तक्रारदार व्यावसायिकाचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस हवालदार चमनशेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *