मुंबई: पगार न झाल्याने बेस्ट बसचे कंत्राटी कर्मचारी संपावर

मुंबई: मुंबईतील बेस्ट बसच्या कंत्राटी बस चालकांनी संप सुरू केला आहे. आज (शुक्रवारी) सकाळी विक्रोळी बेस्ट बस डेपोमधील कंत्राटी बस चालकांनी अचानक संप सुरू केला. यामुळे बेस्ट बस सेवेवर परिणाम झाला. या डेपोतील १५० चालकांनी हा संप सुरू केला. गेल्या 3 महिन्यांपासून ते 6 महिन्यापर्यंत यांचे वेतन झाले नाही आणि त्यांचे पीएफ सुद्धा जमा करण्यात आलेला नाही अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

याबाबत बेस्ट बसचे कंत्राटी कर्मचारी म्हणाले की, गेल्या 3 महिन्यांपासून ते 6 महिन्यापर्यंत यांचे वेतन झाले नाही आणि त्यांचे पीएफ सुद्धा जमा करण्यात आलेला नाही. शिवाय बेस्ट प्रशासनाकडे तसेच एमपी या कंपनीकडे तक्रारी केल्या, पण अजूनही काहीच झाले नाही. अनेकजण घराचे भाडे भरु शकले नाहीत. मुलांच्या शाळेची फी भरू शकले नाही. दररोजचा किरकोळ खर्चही करणंही या कर्मचाऱ्यांना कठीण जातंय. त्यामुळे हे कर्मचारी हतबल झाले आहेत. ऐन कामाच्या वेळी अचानक पुकारलेल्या संपामुळे चाकरमान्यांचे हाल झाले.

दरम्यान गुरुवारी (काल) वडाळा बस डेपोमधील कर्मचाऱ्यांनीही असाच अचानक संप पुकारला. त्यामुळे कालसुद्धा असाच गोंधळ झाला होता. राज्यात एकीकडे एसटी कर्माचाऱ्यांचा संप संपल्यात जमा होत असताना आता मुंबईतील बेस्ट बसच्या कर्मचारी हे संपाच्या पावित्र्यात असल्याचं दिसतंय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply